कुही :- तालुक्यातील सातारा शिवारात गोठ्याला आग लागून आगीत होरपळून एका बैलाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
सातारा शेतशिवारात रामेश्वर बाळाजी मुटकुरे या शेतकऱ्याचे शेत असून ते शेतातच नेहमी बैल बांधत होते. शनिवारी सायंकाळी ६.३० दरम्यान गोठ्याला आग लागली असून लागलेल्या आगीत गोठ्यात बांधलेल्या बैलजोडी पैकी एका बैलाचा आगीने होरपळून मृत्यू झाला असून दुसरा बैल गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळतात गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत दुसऱ्या बैलाला वाचवले. एन हंगामात बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून घटनेचा पंचनामा करीत शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.