मांढळ मध्ये गोवंशाची हत्या करीत मांस विक्री ; दोन आरोपी ताब्यात

मांढळ मध्ये गोवंशाची हत्या करीत मांस विक्री ; दोन आरोपी ताब्यात

निखिल खराबे

कुही : भोलाहुडकी मांढळ येथे एका गोवंशाची हत्या करीत नागपूर – आंभोरा रस्त्यावरील मांढळ भूषण बार समोर मांस विक्री करीत असताना दोन व्यक्तीला ताब्यात घेतले. ही घटना रविवार,दि.२०जुलै २०२५ ला संध्याकाळी घडली. या गुन्ह्यात आरोपी म्हणून क्रिष्णा उर्फ अमोल खेमराज लारोकर(वय २६)रा. वार्ड क्र.०६,भोलाहुडकी,मांढळ व राहुल उर्फ शेरा भिमेश खोब्रागडे(वय ३५)रा.वार्ड क्र.०६ मांढळ असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांढळ येथे दोन इसम गोवंश मास विक्री करीत आहे.अशा माहीतीवरून अंभोरा रोडवरील भूषण बार मांढळ चे समोर रोडवर उभे असता मो.सा. वाहन क्र.एम.एच. ४० एस ६७०७ पॅशन प्रो कंपनीचे वाहनाने दोन इसम पोलिसा समोरून येत असता सदर वाहनाचालकास थांबवुन विचारपुस केली असता त्यानी आपले नाव क्रिष्णा उर्फ अमोल खेमराज लारोकर व राहुल उर्फ शेरा भिमेश खोब्रागडे असे सांगीतले असता त्यांचे जवळ असलेल्या पिवळ्या रंगाची थैली दिसुन आली.सदर थैली बाबत आम्ही पंचासमक्ष विचारपुस केली असता प्रथम उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने आम्ही पंचासमक्ष पशु वैद्यकीय अधिकारी यांना पाहणी करण्यास सांगितले असता त्यामध्ये काळ्या रंगाचे प्लॅस्टीक पन्नीमध्ये गौमांस दिसुन आल्याने सदर गौमासांबाबत विचारपुस केली असता नामे क्रिष्णा उर्फ अमोल खेमराज लारोकर याने सांगीतले की. सदरचे गौमांस विक्री करण्याकरीता घेवुन जात आहे. असे सांगीतले असता सदर चे गौमास अंदाजे वजन ०३ किलोग्रॅम प्रत्येकी १५० /- रु. किलोग्रॅम प्रमाणे एकुण ४५०/- रू.चे गौवंश मांस व वाहन क्र. एम.एच.४० एस. ६७०७ पॅशन प्रो कंपनीचे अंदाजे कीमत ३०,०००/-रू. असे एकुण ३०४५०/-रु.चा मुद्देमाल पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आले तसेच अमोल लारोकर यास सदर गौमांस कोठुन आणले याबाबत विचारणा केली असता त्यानी सांगीतले की सदर गौमांस माझे राहते घर वार्ड क्र.०६,भोला हुडकी,मांढळ येथे आज दि.२० जुलै दु.३:००वा.चे दरम्यान सदर गौवंशाची कत्तल करून विक्री करण्याचे उद्देशाने आम्ही दोघे जात असुन उर्वरीत गौमांस विक्री करीता भोलहुडकी येथील घरात ठेवलेला आहे.असे सांगीतल्या वरून आम्ही सदर दोन्ही इसमांना सोबत घेवुन पो स्टाफ, पंच व पशु वैद्यकीय अधिकारी असे मिळुन शासकीय वाहनाने भोलाहुडकी,मांढळ येथे त्याच्या घरी जाऊन घराचे आतमध्ये असलेल्या लोखंडी पलंगाचे बाजुला दोन नायलॉन चुगडीमध्ये मांस,पायाचे तुकडे, व कथ्या रंगाचे चामडे व गौवंशाचे मुंडके भरलेले दिसुन आल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी सदर मांसाची पाहणी केली असता सदरचे मांस हे गौवंश मांस असल्याचे सांगीतले. सदर मांसाचे अंदाजे वजन २० किलोग्रॅम असुन अंदाजे प्रत्येकी किलो किंमत १५०/-रु. प्रमाणे एकुण ३०००/-रू. व दोन लाकडी ठोकळे किंमत प्रत्येकी ५०/-रु. प्रमाणे किंमत १०० रु. व दोन लोखंडी सत्तुर किंमत अंदाजे प्रत्येकी ५०/- रू प्रमाणे एकुण १००/-रू. असे दिसुन आल्याने सदर गौवंश मांस,लाकडी ठोकळे व दोन लोखंडी सतूर एकुण ३२००/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर गौवंशाची कत्तल करून गौमांस विक्री करीता ठेवले म्हणून दोन्ही इसमांना चोरटयारितीने विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आले आहे.करीत आरोपी विरुद्ध भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागवीण्यास प्रतीबंध अधिनियम १९६०,कलम ११(१)(ल) व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५,५ (क), ९, ९(अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करीत दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोउपनि.अजय पंचभाई,पोउपनि.धिरज मसराम,पंच व पशुवैद्यकीय अधिकारी लईक अहमद खान यांच्या समक्ष पो.ह.रोशन नारनवरे पुढील तपास करीत आहे.