प्रेमीयुगलांची विष प्राशन करून नागनदीत उडी मारून आत्महत्या
कुही : प्रेमात आडकाठी येत असल्याने एका प्रेमीयुगलाने टोकाचा निर्णय घेत विषारी द्रव्य प्राशन करीत नागनदीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना दातपाडी (सावळी) देवस्थान जवळील नागनदी काठावर रविचार,दि.१८ ऑगष्ट २०२४ रोजी दुपारी अडीच ते साडेपाच या वेळात घडली.
आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगलांचे नांव निश्चय भानूदास मंथनवार(वय२४) रा.आजनगाव, ता. मौदा व कु. चांदनी अंकूश फूलबांधे(वय १९)रा. वडोदा, ता. कामठी असे आहे.दोघांचेही गेली वर्षभरापासून प्रेमसंबंध होते.याच प्रेमात घरच्यांची आडकाठी येत असल्याचे जाणवताच दोघांनीही टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी दोघेही मृतक आपापल्या घरून दुपारच्या समयी निघाले.ते थेट दातपाडी(सावळी) येथील महानागबळेश्वर मंदिरात आली. व नागनदीच्या काठावर बसून दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन करीत नदीत उडी मारली.दोघेही नदीच्या पाण्यात एका झाडाला लटकलेले दिसले.ही घटना मंदिरातील नागरिकांना माहीत होताच त्यांनी ही माहिती कुही पोलीस स्टेशनला कळविली.कुहीचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या घरच्यांना माहिती देऊन दोघांनाही बाहेर काढीत भुगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले.तेथे प्राथमिक उपचार करीत दोघांनाही नागपूर मेडिकल मध्ये भरती करण्यात आले.तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यात मृतक निश्चय मंथनवार याची आई भारती मंथनवार व कु.चांदणी फुलबांधे हिचे काका संदीप मूलचंद फुलबांधे यांच्या तक्रारीवरून कुही पोलिसांनी मर्ग क्र.३९/२०२४,कलम १९४ भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ नोंदवून पुढील तपास पोनि भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात पोहवा चांगदेव कुथे प्रविण जावरकर करीत आहे.