वृद्ध महिलेची आत्महत्या

वृद्ध महिलेची आत्महत्या

कुही : मांढळ येथील वार्ड क्र.६ मध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेने घरीच असलेले विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली.ही घटना शुक्रवार, दि.१६ऑगष्टच्या मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान स्वतःच्याच घरी घडली.

सारुबाई शालीकराम डहाके (वय ७३)रा.मांढळ असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव  आहे.वृद्ध महिलेचा मुलगा प्रदीप शालीकराम डहाके (वय ४०) रा.वार्ड क्र.६,मांढळ याने कुही पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार असे समजते की, शुक्रवार,दि.१६ ऑगष्टच्या रात्री आम्ही सर्वजण झोपी गेलेलो होतो.मध्यरात्री आईची प्रकृर्ती अचानक खराब झाल्याने आम्ही तिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे आणले परंतु तिथे कोणीही नाही म्हणून कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार करून नागपूर मेडीकल इस्पितळात दाखल करण्यात आले.दि.१७ ला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला यावेळी विषारी द्रव्य प्राशन केले होते हे निष्पन्न झाले.विषारी द्रव्य प्राशन का केले हे कळू शकते नाही.वृद्धेच्या मुलाच्या तक्रारीवरून कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.व पुढील तपास पोहवा चागदेव कुथे करीत आहे.