कुही तालुक्यातील बुट्टिटोला  येथे विद्युत प्रवाहाने वन्यप्राणी चितळाची शिकार ; 11 आरोपी अटकेत

कुही तालुक्यातील बुट्टिटोला  येथे विद्युत प्रवाहाने वन्यप्राणी चितळाची शिकार 

11 आरोपी अटकेत

कुही :- उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात (16 डिसें.) उमरेड-करांडला अभयारण्यालगत मौजा-बुट्टीटोला ता. कुही येथे वन्यप्राणी चितळाची विद्युत प्रवाह लावून शिकार केली व त्याचे मांस कापून गावात वाटप केले असल्याची माहिती मिळताच क्षेत्र सहायक पचखेडी यांचे चमूने आरोपी आरोपी लक्ष्मण किशन मडावी वय-43 वर्ष रा. बुट्टीटोला पो. डोंगरमौदा  ता. कुही  जि. नागपूर यांना ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे कलम 2(16), 9,  39, 48A, 49 नुसार वनगुन्हा नोंदविण्यात आला.

आरोपीच्या राहते घरून वन्यप्राण्याचे अंदाजे ३ किलो कच्चे मांस जप्त करण्यात आले. दिनांक 18/12/2024 रोजी आरोपीस मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, कुही येथे दाखल केले असता मा.न्यायालयानी आरोपीस दिनांक-18/12/2024 ते 20/12/2024 पर्यंत 03 दिवसाची वनकोठडी सुनावली. तपासा दरम्यान आरोपी लक्ष्मण किशन मडावी याने वन्यप्राणी चितळाचे मांस वाटप केलेल्या व वनगुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची नावे सांगितली असता दिनांक 19/12/2024 रोजी आणखी 10 आरोपींना अटक करण्यात आली. सदर आरोपीची नावे 1)सचिन अशोक नेवारे वय-30 वर्ष रा. बुट्टीटोला पो. डोंगरमौदा ता. कुही  जि.नागपूर 2) सुरज देवराव कारसरपे वय-24 वर्ष रा.बुट्टीटोला पो.डोंगरमौदा ता.कुही  जि.नागपूर 3)लक्ष्मण शामराव नेवारे वय-36 वर्ष रा. बुट्टीटोला पो.डोंगरमौदा ता.कुही  जि.नागपूर 4)भगवान शामराव नेवारे वय-29 वर्ष रा. बुट्टीटोला  पो.डोंगरमौदा ता.कुही  जि.नागपूर  5) साहिल रामदास शेंदरे वय-17 वर्ष रा. बुट्टीटोला  पो.डोंगरमौदा ता.कुही  जि.नागपूर 6)ईश्वर श्रावण राऊत वय-71 वर्ष रा. बुट्टीटोला पो. डोंगरमौदा ता. कुही  जि.नागपूर 7) रोहित नत्थू वारजूरकर वय-19 वर्ष रा. धामणा पो. डोंगरमौदा ता.कुही जि.नागपूर 8) दिनेश अशोक नेवारे वय-32 वर्ष रा. बुट्टीटोला पो. डोंगरमौदा ता. कुही  जि.नागपूर 9) नरेंद्र ईश्वर कुंभरे वय-45 वर्ष रा. धामणा पो. डोंगरमौदा ता. कुही जि. नागपूर 10)रोशन बंडू मांढरे वय-32 वर्ष रा. धामणा पो. डोंगरमौदा ता. कुही जि. नागपूर असे आहेत. सर्व आरोपी यांना न्यायालय कुही येथे दाखल केले असता पुढील तपासाकरीता मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, कुही यांनी सर्व 11 आरोपीला  15  दिवसाची न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे. सर्व 11 आरोपी यांना सेंट्रल जेल नागपूर  येथे रवानगी करण्यात आली असून या  प्रकरणाचा पुढील तपास डॉ. भारत सिह हाडा, उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग नागपूर व श्री. मनोज धनविजय, सहायक वनसंरक्षक, उमरेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पी. डी. बाभळे वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर उमरेड हे करीत आहेत. प्रकरणाची कार्यवाही श्री. आर. डब्लू. पिल्लेवार क्षेत्रसहायक पचखेडी, श्री. एस. यु. चव्हाण क्षेत्रसहायक कुही, श्री. नितीन सेलोकर वनरक्षक मांढळ, कु. सीमा हरडे वनरक्षक वेलतूर, कु. ए. एम. किरमरे वनरक्षक पचखेडी, कु. सीमा भोयर, कु. लक्ष्मी शेंडे, कु. निराशा पिपरे, वनरक्षक व श्री. आस्वले, श्री. तितरमारे वनमजूर यांनी पूर्ण केली.