शाळेतून घरी जाताना आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला : आयसीयूमध्ये उपचार सुरु ; घटना सीसीटीव्हीत कैद

शाळेतून घरी जाताना आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला : आयसीयूमध्ये उपचार सुरु ; घटना सीसीटीव्हीत कैद

नागपूर : शाळकरी विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या विद्याथ्याचे नाव अर्णव भिमटे (१३ वर्ष) असे आहे. तो आठवीचा विध्यार्थी आहे. त्याच्यावर चाकू हल्ला झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीबीएसई इयत्ता आठवीचा विद्यार्थी शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी विद्यार्थ्यांवर मेयो हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुलं पळून जाताना दिसत आहे. यामुळे हा हल्ला मुलांनीच केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अर्णववर हल्ला झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुजेटमध्ये पळणारी मुलं अर्णवच्याच वयाची असल्याचे दिसतंय. त्यामुळे आपापसातल्या वादातून हल्ला झाला असावा, अशीही शंका पोलिसांकडून व्यक्त केली जातेय.