आधी माय-लेकीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; नंतर दोघींवर केले अत्याचार, व्हिडिओही काढला

आधी माय-लेकीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; नंतर दोघींवर केले अत्याचार, व्हिडिओही काढला

 नागपूर : नागपूरमधून संतापजनक घटना समोर येत आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या तरुण मुलीवर देखील बलात्कार केला आहे. एवढ्यावरच न थांबता प्रियकराने दोघींची मोबाइलद्वारे आक्षेपार्ह चित्रफित काढली आणि ती समाजमाध्यमांवर व्हायरल केली आहे. त्यानंतर तो पसार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. ४२ वर्षीय प्रियकर हा चालक आहे.

जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला दोन मुलींसह राहते. सुमारे दहा वर्षांपूर्वी पीडित महिलेची चालकासोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान त्याने महिलेच्या २० वर्षीय मुलीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. या संपूर्ण कृत्याची त्याने मोबाइलद्वारे दोघींच्या आक्षेपार्ह चित्रफीतही काढल्या. या चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन तो दोघींचे लैंगिक शोषण करत होता.

दरम्यान, त्याने पीडितांच्या या आक्षेपार्ह चित्रफीत इंस्टाग्रामवर व्हायरल केल्या. ती त्याच महिलेच्या लहान मुलीला दिसली. तिने आई व बहिणीला याबाबत सांगितले. समाजमाध्यमांवर चित्रफीत व्हायरल झाल्याने महिलेने जरीपटका पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे.