भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू ; नागपूर जवळील गुमगाव परिसरातील हृदयदावक घटना

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू ; नागपूर जवळील गुमगाव परिसरातील हृदयदावक घटना

नागपूर: हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत एक हृदयदावक घटना उघडकीस आली आहे. जिथे गुमगाव परिसरात एका चार  वर्षाच्या निष्पाप मुलीवर पुलाखाली भटक्या कुत्रांनी हल्ला केला, या दुखद घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. असे सांगितले जाते आहे कि, तिची आई नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली असावी या विचाराने हर्षिता नदीवर एकटीच गेली, आणि खेळत खेळत ती पुलाखाली पोहचली जिथे हा अपघात झाला.

दुपारी दोनचा सुमारास हर्षिता घरी दिसत नसल्याने तिच्या आईने शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. परंतु शोधाशोध केल्यानंतरही हर्षिता दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी सर्वीकडे शोध घेतला. काहींनी नदीकडे धाव घेतली. त्यातच पुलाखाली बघितले असता हर्शिताचा मृतदेह रक्ताने माखलेला आढळला. आणि, तिच्याभोवती भटक्या कुत्र्याचा घोळका फिरत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

या दुर्दैवी अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून परिसरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांची समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी स्थानिकांनी प्रशाषनाकडे केली आहे.