वीज पडून महिलेचा मृत्यू ; वेलतूर शिवारातील घटना

 वीज पडून महिलेचा मृत्यू ; वेलतूर शिवारातील घटना

स्वप्निल खानोरकर 

कुही : – तालुक्यातील चिखली-वेलतुर शिवारात वीज पडून ५२ वर्षीय शेतकरी  महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २३ जुलै रोजी सायं. पाच वाजताच्या सुमारास घडली. कांता नारायण खोब्रागडे (वय ५२, रा. वेलतुर) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या प्राप्त  माहितीनुसार, कांता खोब्रागडे या आपल्या शेतात धान पिकाचे पऱ्हा निंदण करीत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. काही क्षणांतच आकाशात गडगडाटासह वीज कोसळली आणि त्या वीज कोसळून  त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वेलतुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत मिसाळे, मंडळ अधिकारी आशीष धनविजय आणि तलाठी आनंद मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह वेलतुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला. तेथून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, कुही येथे पाठविण्यात आला.या घटनेमुळे वेलतुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या प्रकरणी वेलतुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.