नागपूर : स्नानगृहाचा दरवाजा तोडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : स्नानगृहाचा दरवाजा तोडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना आरोपी दिनेश राजू गुप्ताने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिनेश राजू गुप्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आठवीत शिकते. ती तिच्या कुटुंबासोबत  भाड्याच्या घरात राहते. दिनेश गुप्ताच्या कुटुंबाने २०१३ मध्ये हे घर विकत घेतले. त्यानंतर घर खाली करण्यावरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू आहे. हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करीत असतांना दिनेशने बाथरूमचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. त्याने मुलीचा विनयभंग केला. मुलगी ओरडण्याचा प्रयत्न करत असताना, दिनेशने तिचे तोंड दाबले. पीडित मुलगी कशीतरी त्याच्या तावडीतून सुटली. तिने घरात येऊन घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला.

त्यानंतर आई आणि मुलगी दोघीही पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. त्यांनी दिनेश गुप्ता विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी दिनेश राजू गुप्ता (वय २८) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.