अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पकडला ; वेलतुर पोलिसांची कार्यवाही
कुही :- वेलतूर पोलिसांचा चमू पेट्रोलिंग करत असताना पो.स्टे. वेलतूर हद्दीतील म्हसली पुनर्वसन नजीक अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला असून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेलतुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील व चमू पेट्रोलिंग करत असताना दि. २३ ऑगस्ट ला पहाटे 4 वाजताच्या दरम्यान मौजा- म्हसली पुनर्वसन गावाजवळ अंभोरा ते पचखेडी रोडने MH40 CN 7116 हा ट्रक जाताना दिसून आला. पोलिसांनी लागलीच ट्रक थांबवत ट्रकची पाहणी केली असता रेतीने भरलेला ट्रक आढळला. पोलिसांनी ट्रक चालक याचे नाव विचारले असता मोहन हरिसिंग वलके (वय ३४ )रा.प्लॉट नं.२१३, जुना बगडगंज ,नागपूर असे सांगितले. पोलिसांनी ट्रकमधील रेतीची रॉयल्टीबाबत विचारणा केली असता. रोयाल्टी नसल्याचे समजले. पोलिसांनी अवैध रेतीचा ट्रक चालक जवळ रेती वाहतूक परवाना ( रॉयल्टी) नसल्याने सदर 12 चक्का ट्रक व ट्रक मधील 9 ब्रास रेती असा एकूण अंदाजे किंमत 32,45,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालक याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई वेलतुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांचेसह वेलतूर पोलिसांनी केली आहे .




