कुही – आंभोरा मार्गावर अनियंत्रित कार पलटली : दोघे गंभीर जखमी
कुही : कुही वरून मांढळ कडे येत असलेली कार कटारा गावाजवळील वळण रस्त्यावर वेगात असल्याने अनियंत्रित झाली.व चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ने दोन तीन पलटी घेत बाजूच्या नाल्यात पडली. यात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. जखमी मध्ये चालक गौरव विठ्ठलराव बंदेलवार (वय ३५) व देवा तुकाराम बेडके (वय ३०) दोघेही रा. मरुपार, ता. चीमुर, जि. चंद्रपूर असे आहे.
कार क्र. एम एच ३१, डी के. ६७५८ क्रमांकाच्या कारने चालक गौरव मद्य प्राशन करून भरधाव वेगात नागपूर वरून मांढळ कडे येत असता कटारा गावानजीक असलेल्या वळण रस्त्यावर कार अनियंत्रित झाली. यातच चालकाचे संतुलन बिघडल्याने रस्त्यावर गाडीने दोन तीन पलट्या खात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या मध्ये जाऊन पडली.

घटनेची माहिती मिळताच मांढळ चौकीचे बिट जमादार सुधीर ज्ञानबोण्डवार व शिपाई रणजित घटनास्थळी दाखल झाले. प्रथम कार मध्ये फसलेल्या चालक गौरवला बाहेर काढले. लागलीच अंबुलन्स बोलावून जखमींना कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले. पुढील तपास कुही पोलीस करीत आहे.


