विवाहबाह्य संबंधांचा भयावह शेवट; गळफास लाऊन पतीची आत्महत्या

विवाहबाह्य संबंधांचा भयावह शेवट; गळफास लाऊन पतीची आत्महत्या

नागपूर : प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून होणारा छळ असह्य झाल्याने पतीने गळफास लाऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पत्नीला अटक केली. दुर्गेश्वरी वय ३५ ,असे अटकेतील तर राहुल मनोहर वय ४५ असे फरार आरोपीचे नाव आहे. नरेंद्र वय ४१, रा. गोधनी रेल्वे असे मृतकाचे नाव आहे.

दुर्गेश्वरी व राहुलचा अनैतिक नात्याबद्दल नरेंद्र यांना कळाले. त्यावरुन त्यांचे दुर्गेश्वरीसोबत नेहमी खटके उडायचे. त्यातच राहुल व दुर्गेश्वरीने नरेंद्र यांचा अपमान करीत त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यामुळे नरेंद्र तणावात राहायला लागले.

पत्नी व तिचा प्रियकराकडून होणारा अपमान सहन न झाल्याने नरेंद्र यांनी लोखंडी हुकला दुपट्टा बांधून गळफास घेतला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान दुर्गेश्वरी व राहुलने मारहाण व शिवीगाळ केल्याने नरेंद्र यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दुर्गेश्वरीला अटक केली. व फरार आरोपी राहुलचा शोध सुरु आहे.