Home Breaking News आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या ; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद 

आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या ; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद 

आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

घटना सीसीटीव्ही मध्ये कैद 

कुही  :  तालुक्यातील आंभोरा येथे एका तरुणाने पुलावरून वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, प्रज्वल यांनी आंभोरा येथील पुलावरून नदीत उडी मारल्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार व नागरिकांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली.

नदीतील पाण्याचा प्रवाह आणि पाण्याची खोली यामुळे शोधकार्य करताना अडचणी येत आहेत. वृत्त लिहितोवर मृतदेह हाती लागलेला नव्हता. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अधिकृत माहितीचीच दखल घ्यावी व अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून तपास सुरु आहे.

Don`t copy text!