जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक ; १,३५,७५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त
कुही : पोलीस स्टेशन हद्दीतील नवेगाव – इसापूर शेत शिवार येथे अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करून तीन आरोपींना अटक केली आहे. यातील आरोपीचे नाव कैलास राउत (वय ४२) रा. निरव्हा, नरेश फुलझेले (वय ६०) रा. नवेगाव ईसापुर ,तुषार फेंडर (वय २७) असे आहे. कुही पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवेगाव – इसापूर येथील शेत शिवारात काही इसम ५२ ताशपत्तयांवर जुगार खेळत आहे, असे माहीत होताच पोलिसांनी आरोपीची होंडा शाईन मो.सा. क्र. एमएच ४० एवाय ३४४२ चा चालक हे ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळतांना दिसुन आले.
पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. पोलीसांनी पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातुन ५२ तासपत्ते किंमती ५० /- रूपये, रोख रक्कम ५७०० /- रूपये व मोटार सायकल होंडा शाईन क्रमांक एम एच ४० ए वाय. ३४४२ किंमत ७०,००० /- रूपये, हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच ३१ डि.एल. ९३४० किंमत ६०,००० /–रूपये असा एकुण किंमती १,३५,७५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर आरोपीविरूध्द कलम १२ (अ) म जु का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



