कुलरचा करंट लागून महिलेचा मृत्यू
महिनाभरातील दुसरी घटना
कुही:- सकाळी घरातील साफसफाई करत असताना घरातील कुलरला स्पर्श होऊन करंट लागल्याने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे.

पुष्पा परसराम कूथे (वय58) रा.वेलतुर असे मृतक महिलेचे नाव आहे.पुष्पा ह्या नियमित प्रमाणे आज सकाळी 7 वाजताच्या घरातील साफसफाई करत असताना अचानक घरातील कुलरला त्यांचा स्पर्श झाला. कुलरला करंट असल्याने पुष्पा यांना जोरदार विद्युत करंट लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ वेलतुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व तेथे प्राथमिक उपचार करून कुही येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे कळले. वेलतुर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. गेल्या महिन्याभरात वेलतुर भागातील ही करंट लागून मृत्यु झाल्याची दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी आंभोरा येथे एका 9 वर्षीय बालकाचा कुलरच्या करंटने मृत्यू झाला होता. सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून याचा अधिक तपास वेलतुरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रवी फरकडे करीत आहे.

