येणाऱ्या पिढ्यांना विकास दिसावा म्हणून स्वतः दिलेल्या बलिदानाचे दुःख नाही ; कुहीच्या आरोग्य शिबिरात माजी आ. राजू भाऊ पारवेंची भावना

येणाऱ्या पिढ्यांना विकास दिसावा म्हणून स्वतः दिलेल्या बलिदानाचे दुःख नाही

 

कुहीच्या आरोग्य शिबिरात माजी आ. राजू भाऊ पारवेंची भावना

 

कुही :- कुही शहर आणि एकूणच उमरेड विधानसभा क्षेत्रात विकास दिसावा, येणाऱ्या पिढ्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त करावे यासाठी स्वतःला जे राजकीय बलिदान द्यावे लागले त्याचे अजिबात दुःख नसल्याची भावना माजी आ. राजूभाऊ पारवे यांनी कुही येथील आरोग्य शिबिरात व्यक्त केली.

 

बुधवारी (दि.२४) राजूभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्यावतीने कुही येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी आ. राजू भाऊ पारवे यांच्या हस्ते झाले. यावेळी कुही नगर पंचायतच्या अध्यक्षा हर्षाताई इंदूरकर, उपाध्यक्ष अमित ठवकर, माजी जि.प.सदस्य डॉ. शिवाजी सोनसरे, आनंद खडसे, नगरसेवक रुपेशकुमार मेश्राम, नगरसेवक निखील येळणे, सभापती शारदाबाई दुधपचारे, नगरसेवक मयूर तळेकर, नगरसेवक निशाताई घुमरे, बांधकाम सभापती जयश्रीताई धांडे,  नगरसेवक विनोद हरडे, अरुण धांडे, विलास राघोते, सौरभ दंडारे, गोलू लांबाडे, सूरज देशमुख, आकाश लेंडे, प्रकाश पडोळे, आशिष धनजोडे आदी मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. नेत्र तपासणी, रक्त तपासणी, इसिजी यासह इतर मोफत सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला. शेकडो रुग्णांना यावेळी मोफत चष्मे देण्यात आले. या आरोग्य शिबिरात अनेकांनी रक्तदानही केले.

उपस्थितांशी संवाद साधताना राजूभाऊ पारवे म्हणाले की, स्वतःच्या फायद्यापेक्षा आपण नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. कायम विकासाभिमुख राजकारण केल्यानेच आज या व्यासपीठावर सर्व पक्षाचे नेते उपस्थित राहिले असून या गोष्टीचा आनंद असल्याचे सांगून शिबिराच्या व्यतिरिक्त देखील शेकडो रुग्णांना आपण मोठी मदत करण्याचे कर्तव्य पार पाडले असून यापुढेही आपण कोणत्याही परिस्थितीत गरजुंच्या मदतीला येऊ असे राजू पारवे म्हणाले. गावासाठी योगदान देणारे पोलीस पाटील व जोखीम घेऊन सेवा करणारे वीज कर्मचारी यांच्याबद्दल राजूभाऊंनी कृतज्ञता व्यक्त केली. राजू भाऊंच्या हस्ते मोमेंटो व गिफ्ट देऊन सत्कार केला गेला. कुही येथील शिक्षकवृंदांचा सत्कार करत सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार झाला.

दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र अवदुत व योगेश पडाळे यांनी अनेक योजनांची सविस्तर माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. लाडकी बहिण सह इतर योजनांसाठी नाव नोंदणी करण्याकरिता यावेळी मोठी गर्दी झाली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष नरेश झुरमुरे, यांनी केले.व आभार नगरसेवक विलास राघोर्ते यांनी केले. यावेळी शिबिरार्थिंसह  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.