विरखंडी शिवारात आमनदीच्या पाण्यात आढळला तरुणाचा मृतदेह
कुही :- पोलीस स्टेशन वेलतुर हद्दीत येत असलेल्या मौजा विरखंडी येथील विजय भाऊराव वासनीक (वय-३२) हा युवक आम नदीत बुडून मरण पावला.
मृत विजय वासनिक याला दारुचे व्यसन होते. मंगळवार पासून तो घरुन बेपत्ता होता. शोध घेऊनही सापडत नसल्याने घरचे नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची तक्रार वेलतुर पोलीस ठाण्यात बुधवारला दिली. तेव्हा पासून घरचे नातेवाईक व गावकरी त्याला शोधत होते. गावकऱ्यांनी आम नदीच्या दोन्ही तिरावर हरदोली, वग,पारडी, मांढळ,पचखेडी पर्यंत त्यचा शोधाशोध केला पण कुठेही पत्ता लागला नाही. आज सकाळी १० वाजता विरखंडीच्या पुलाच्या समोर जवळपास शेती असलेल्या लोकांना दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी नदीच्या पात्रात जावून शोधाशोध केला असता त्यांना नदीच्या पाण्यात एक कुजलेल्या अवस्थेत प्रेत दिसले. ते विजय वासनिक चे असल्याचे ओळख झाली. वेलतुर पोलीस ठाण्यातील हेड काँस्टेबल रवींद्र फरकाडे यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून प्रेत कुही कुही येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करीता पाठविले.वेलतुर पोलीस स्टेशनमध्ये १९४ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रवींद्र फरकाडे करीत आहे.




