जिवंत विद्युत तारांना स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू ; पोल पडल्याचे सांगूनही लाईन बंद न केल्याने घडला प्रकार

जिवंत विद्युत तारांना स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू

पोल पडल्याचे सांगूनही लाईन बंद न केल्याने घडला प्रकार

कुही :-  वादळी वारा व पाऊसाने मांढळ शेतशिवारात  पडलेल्या पोलाचे जिवंत विद्युत तारा रोडवर पडल्याने त्यावर बैलाचा पाय पडल्याने एका बैलाचा जागीच मूत्यू झाला आहे.

शनिवारी (दि.२१) ला आलेल्या  पाऊसासह वाऱ्याने  कुही तालुक्यातील मांढळ  शिवारातील सुरेश  गोंदेवार यांच्या नजीक विद्युत पोलासह विद्युत तारा शेतासह रस्त्यावर पडल्या. विद्युत तारा पडल्याची तक्रार  गोंदेवार यांनी महावितरण कार्यालयात  देण्यासाठी गेले असता रविवार असल्याने कार्यालय बंद होते. परिणामी गोंदेवार यांनी याची माहिती ओळखीच्या महावितरण कर्मचाऱ्याला दिली. मात्र याकडे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी सोमवारला (दि.२३)  मांढळ येथील शेतकरी इमरान शफी तुरक (शेख) यांचा सालगडी (शेतात काम करणारा) बैल बंडी घेऊन जात असताना विद्युत तारेवर बैलाचा पाय पाडून बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. एन हंगामात बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे अंदाजे 50 हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे.