२५ च्या मध्यरात्रीपासून आंभोरा पूल वाहतुकीसाठी बंद

२५ च्या मध्यरात्रीपासून आंभोरा पूल वाहतुकीसाठी बंद

कुही:- नागपूर व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा आंभोरा येथील वैनगंगा नदीवरील केबल पूल सुरू झाल्याने महाशिवरात्री यात्रेनिमित्त आंभोरा देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये व गैरसोय टाळण्यासाठी २५ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून ते २८ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंभोरा येथील वैनगंगा नदीवरील अवजड वाहतूक बंद राहणार असल्याचे जिल्हा वाहतूक शाखा नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय नागपूर यांनी सांगितले आहे.