अपघात; ट्रकचा धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा मृत्यू

अपघात; ट्रकचा धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा मृत्यू

कन्हान : विट भट्यावर काम करणाऱ्या महिलेला डुमरी पेट्रोलपंप जव़ळ रस्ता पार करताना कन्हानकडून मनसरकडे जाणा-या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघाात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, कन्हान पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

अशोक मकरध्वज मरकाम (मप्र) हा, आई व पत्नीसह दिड महिन्याअगोदर वीटभट्टी मालक सतोष चौधरी मरारवाडी नागपुर यांचेकडे वीटभट्टी मजुरीच्या कामाकरीता आले होते. त्याची आई मिराबाई ही डुमरी येथे जाण्यास घरून निघाली. ती रामटेकवरून कन्हानला जाऊन तेथुन, ऑटोने डुमरी पेट्रोलपम्प समोर डुमरी गावात जाण्यास, नागपुर जबलपुर महामार्ग पार करीत असतांना, कन्हानकडुन येणाऱ्या भरधाव ट्रकने, महिलेला जोरदार धडक दिली. महिला रोडवर पडल्यावर तिच्या अंगावरून ट्रकचे चाक गेलेत.

या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याने तेथील लोकांनी पोलिसांना सुचना दिली. कन्हान पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन, लोकांच्या मदतीने महिलेला उपचाराकरीता शासकिय मेयो रूग्णालय नागपुरला नेले असता, डॉक्टरांनी तपासुन तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

सायंकाळी अशोक मरकाम यांना, आईचा ट्रकने अपघात झाल्याची माहिती मिळाली. ते कन्हान पोलीस स्टेशनला पोहचुन, ट्रक चालकाविरूध्द तक्रार दाखल केली. कन्हान पोलिसांनी आरोपी ट्रक चालक हरिचंद्र मोतीराम कोकोडे रा. भंडारबोडी ता. रामटेक यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला असून. या अपघाताचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.