कुही : महिलेची पाण्यात उडी घेत आत्महत्या ; आर्थिक विवंचनेतून घेतले टोकाचे पाऊल
कुही:- तालुक्यातील मौजा भोजापूर येथे एका महिलेने रेल्वे स्टेशन नजीकच्या एका शेततळ्यातच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गोताखोरांच्या मदतीने महिलेचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे.
येनुबाई ईश्वर टेंभरे (वय 52) रा. भोजापूर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मृतक येनुबाई ह्या शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास घरून निघून गेल्या होत्या. अचानक घरून निघून गेल्याने त्यांच्या मुलीने त्यांची शोधाशोध घेतली असता भोजापूर नजीक असलेल्या जुन्या रेल्वे स्टेशनच्या मागील शेततलावानजीक त्यांची चप्पल आढळून आली. लागलीच याची माहिती कुही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गोताखोर बोलावून पाण्यात पाहणी केली असता मृतदेह आढळून आले. कुही पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून महिलेचे मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले.

विशेष म्हणजे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक यांच्यावर कर्ज असल्याने त्या अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होत्या. त्यातच त्या आजारी होत्या त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.


