कुही तालुक्यात तान्हा पोळ्याच्या दिवशी जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड ; ११ आरोपी ताब्यात, रोख रक्कम जप्त..

कुही तालुक्यात तान्हा पोळ्याच्या दिवशी जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड…

११ आरोपी ताब्यात, रोख रक्कम जप्त..

कुही – शनिवार, २३ ऑगस्ट रोजी तान्हा पोळ्याच्या दिवशी वेलतुर व कुही पोलीस स्टेशनच्या पथकाने जुगार अड्ड्यांवर सलग धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ११ जुगारी ताब्यात घेण्यात आले असून आरोपींकडून जुगाराचे साहित्य व रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वेलतुर पोलिसांनी मौजा बोरी सदाचार येथे धाड टाकून आदेश वासनिक, शैलेश भोतमांगे, प्रितम  वासनिक, निखील वाढीवे व यश मेश्राम सर्व राहणार बोरी या पाच जणांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्या ताब्यातून १,९७५ रुपये रोख जप्त केले. दुसऱ्या धाडीत मौजा चन्ना येथे अभिषेक निकोसे, आशिष पाटील, संजय बावणे सर्व रा. चन्ना, व निरंजन महाजन रा. नागपूर असे चार जुगारी गाठले गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून १,१५९ रुपये रोख जप्त केले.

कुही पोलिसांनी साळवा येथे धाड टाकून मदन नान्हे, अजय ठाकरे व नाना सायरे सर्व रा. साळवा या तिघांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्याकडून १,७८० रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तान्हा पोळ्यासारख्या पारंपरिक सणाच्या दिवशी जुगार अड्डे गाठून पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.