ई-पॉस मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे कार्डधारक व दुकानदार त्रस्त,ऑफलाईन धान्य वितरणाची मागणी जिल्हाधिकारी नागपूर यांना निवेदन सोपविले.
कुही : स्वस्त धान्य दुकानदारांना नव्याने देण्यात आलेल्या नवीन ई-पॉस मशीन व सर्व्हरमध्ये येणाऱ्या त्रुट्या व इतरही समस्या दूर कराव्यात व ऑफ लाईन पद्धतीने धान्य वितरण करण्यास परवानगी देण्यात यावी.आदी मागणीसाठी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना कुहीच्या वतीने नायब तहसीलदार देशमुख यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नागपूर यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, शासना मार्फत नव्याने ई-पॉस मशिनचे स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप करण्यात आले आहे. नवीन ई-पॉस मशिनवर शासनाकडून जोडण्यात आलेल्या सर्व्हरबाबत अडचणी येत आहेत.मशीन लाईव्ह करताच एअरर येणे, सर्व्हरमध्ये टाईम आऊट होणे, सतत सर्व्हर बंद पडणे,नेटवर्क जाणे.नवीन मशीन फोर जी व दोन सिमच्या असतांनाही वेगळे वायफाय घेऊन नेटवर्क घ्यावे लागते याचा आर्थिक फटका दुकांदारावर बसतो. सर्व्हर मध्ये आर.डी.हिरवा न होणे,मोबाईलद्वारे वायफाय कनेक्ट न होणे,आदी त्रुटी येत आहेत.त्यामुळे जुलै महिन्यातील वाटप व ई-केवायसी करणे कठीण झाले आहे.मशीनच्या सततच्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे धान्य वाटप हे ऑफलाईन पद्धतीने करावे तशी परवानगी दुकानदारांना देण्यात द्यावी.लाभार्थी रास्त भाव दुकानांकडे वारंवार चकरा मारत आहेत. त्यामुळे रास्तभाव धान्य दुकानदार व ग्राहक यांच्यात वादाचे प्रसंग घडत आहेत.तसेच शासकीय गोदामातून दुकानात पोहोचणारे धान्य हे नेहमीच कमी वजनाचे असते.प्रत्येक ५० किलोग्राम वजनाच्या बोरीत दीड,दोन,अडीच व तीन किलो माल कमी असतो.तेव्हा दुकानदारांना बोरीसाहित ५०,५०० किलोग्राम धान्य देण्यात यावे.अन्यथा पुढील महिन्यात कोणताही दुकानदार धान्य दुकानात उतरवून घेणार नाही,नवीन रेशनकार्ड व धान्य योजनेत नवीन आरसी नंबर देतांना दुकानदारांचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय देण्यात येऊ नये.असे वारंवार सांगूनही दरमहा नवनवीन व सधन नागरिकांचे कार्ड तयार होऊन धान्य उचलत आहे.गरीब मात्र धान्यापासून वंचीत आहेत.तेव्हा दुकानदारांनी दिलेल्या नागरिकांनाच नवीन रेशनकार्ड व आरसी नंबर द्यावेत.जिल्हा प्रशासनाने संबंधीत विभागास वरील सर्व अडचणी दूर करण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी संघटनेचे सचिव प्रदीप घुमडवार, जनार्धन ठवकर,मनोहर लोखंडे,रामकृष्ण कांबळे,सुनीता वैद्य,गंगाधर बावनकुळे,अशोक चांदपूरकर, बार्शीराम चुटे,धर्मेंद्र खोब्रागडे, श्रीराम खानोरकर,निर्मला चौधरी,एल.एस.गिलोरकर,विकास डोंगरे,राजू शेंडे,रामभाऊ थोटे,निळकंठ तुमसरे आदी दुकानदार उपस्थित होते.