कुही पोलिसांची जुगार अड्यावर धाड
७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत ९३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कुही :- कुही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा-उटी शिवारात पारडगाव तलावानजीक 52 पानाच्या ताश पत्यांवर पैश्याची बाजी लावून हार जितीचा खेळ सुरु असलेल्या अवैध जुगार अड्यावर धाड टाकून नगदी रकमेसह ९३३५० रुपयांचा मुद्देमाल कुही पोलिसांनी जप्त केला आहे.
कुही पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहिती मिळाली कि पोलीस स्टेशन कुही हद्दीतील मौजा उटी शिवारातील पारडगाव तलाव नजीक काही इसम 52 पानाच्या ताश पत्यांवर काही जन पैश्याची बाजी लावत हार जितीचा खेळ खेळत असल्याची माहिती मिळाली. लागलीच पोलिसांनी याची शहानिशा करून याची माहिती वरिष्ठांना दिली. पोउपनि स्वप्नील गोपाले यांच्या नेतृत्वात घटनास्थळी पंचासह धाड टाकली असता ७ जन 52 पानाच्या ताश पत्यांवर हार जितीचा जुगार खेळताना दिसून आले. यात 1) अबजल खान अमीर खान (वय-३८) रा.वेलसाखरा, ता. उमरेड , 2)सचिन महादेव बकाल (वय-३५) रा. खापरी , 3)सचिन सुरेश राऊत (वय-३५) रा.पारडगाव, उमरेड 4)दिलीप काशिनाथ राऊत (वय-50) उटी, उमरेड ५)प्रकाश कवडूजी शेंदरे (वय-४०) रा.उटी , ता. उमरेड 6)नंदकिशोर माणिक अरलपायरे (३६) रा. उटी , ता. उमरेड ७) तुषार गोपाल नवघरे (वय-२५) रा. खापरी आदी जुगार खेळताना दिसून आले. पोलिसांनी आरोपींकडून ८३५० रुपये रोख व 2 दुचाकी एकूण ८५००० रुपये असा एकूण ९३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. सर्व ७ आरोपींविरुद्ध कलम १२ म.जू.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊपनि स्वप्नील गोपाले, रवींद्र पोशी, हिवराज लांजेवार, उमेश ठवकर, आशिष चौधरी यांच्या पथकाने केली .



