अनियंत्रित चारचाकी वाहन उलटले ; भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर इतर गंभीर व किरकोळ  जखमी

अनियंत्रित चारचाकी वाहन उलटले 

भीषण अपघातात 6 महिन्याचा चिमुकल्याचा मृत्यू तर इतर गंभीर व किरकोळ  जखमी

कुही :- तालुक्यातील अपघातांचे सत्र सुरुच असून वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुही-आंभोरा मुख्य मार्गावर मौजा अडेगाव शिवारातील नहराजवळील वळणावर चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी नहराच्या सुरक्षा भिंतीला धडकल्याने झालेल्या अपघातात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून 2 गंभीर तर 3 किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

बुधवारी (दि.26) ला सायंकाळी  वेलतूर वरून आंभोरा जात असताना अडेगाव शिवारातील  मुख्य मार्गावरील नहराजवळ चारचाकी  चालकाचे त्याच्या भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी थेट नहराच्या सुरक्षा भिंतीला धडकली. या भीषण अपघातात चारचाकीतील 2 जन गंभीर तर 3 किरकोळ जखमी झाले व  एक 6 महिन्याच्या चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ कुही येथे रेफर केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी यांना नागपूर येथे रेफर केले आहे. या अपघाताचा अधिक तपास वेलतूरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनात वेलतूर पोलीस करत आहे.