अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल ; वेलतूर पोलिसांची कारवाई

अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल

वेलतूर पोलिसांची कारवाई

कुही :- पोलीस स्टेशन वेलतूर हद्दीत येणाऱ्या मौजा- पिपरी मुंजे शिवारात ५२ ताश पत्यांवर पैसे लाऊन हार जितीचा खेळ खेळणाऱ्या 6 जणांवर वेलतूर धाड टाकत कारवाई केली आहे.

शनिवारी दि.२६/०४/२०२५ रोजी वेलतुर पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा पिंपरी मुंजे शिवार येथे काही इसम ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी नामे १) विक्की गोमुजी चौधरी (वय ३६ वर्ष) रा.  शिकारपर, ३) दशरत गनीराम चाचेरकर (वय ३६ वर्ष) रा. वेलतुर, ४) सुरज कवडु डहारे (व‍य ३३ वर्ष) रा. शिकारपुर, ५) राकेश किसणा भोजनकर (वय ३४) रा. शिकारपुर, ६) दिलीप आनंदराव हुंडे (वय ३६ वर्ष) रा. मेंढा हे ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळतांना मिळुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ तासपत्ते किंमती ५० /- रूपये, रोख रक्कम ५,४६०/- रूपये असा एकुण  कि ५,५१०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपीतांविरूध्द कलम १२ (अ) म.जु का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर कारवाई ही वेलतुरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनात वेलतूर पोलिसांनी केली असून पुढील तपास वेलतूर पोलीस करत आहे.