कुही :- महाविकास आघाडी कडून नुकत्याच काही दिवसात विद्यानपरीषदेवर जाणाऱ्या उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विदर्भात मजबूत व बळकट करण्यासाठी जे पक्षासोबत एकनिष्ठ राहीले अशा ज्येष्ठ शिवसैनिकांना संधी मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र प्रकाश जाधव हे खुप वर्षापासुन पक्ष मजबुतीसाठी व वाढीसाठी संघर्ष करतांना पाहायला मिळत आहे. 2007 साली जेव्हा सुबोध मोहिते शिवसेना सोडून दुसर्या पक्षात गेले तेव्हा जाधव यांनी दंड थोपटून पोटनिवडणूकीत विजय मिळवला होता. जेव्हा जेव्हा शिवसेना पक्षावर आघात झाला, पक्षाशी गद्दारी व बेईमानी झाली. त्यावेळी पक्षासोबत व उद्धव ठाकरे सोबत ते खंबीरपणे उभे होते.
विदर्भात शिवसेना (उबाठा) पक्ष जिवंत ठेवण्याचे काम जाधव यांनी केले. नुकत्याच झालेल्या रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे हे विजयी झाले. त्यांच्या यशात शिवसेना (उबाठा) पक्षाने महत्वाची भूमिका बजावली, यामध्ये प्रकाश जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. निवडनुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या त्यांच्या सभेतील भाषणांमुळे मतदार अगदी मंत्रमुग्ध झाले होते. प्रकाश जाधव यांना जर विधानपरीषदेची उमेदवारी दिली तर विदर्भात शिवसेना (उ.बा.ठा) पक्ष पुन्हा भरारी घेऊन जोमाने कार्य करुन पक्ष संघटना मजबूत होईल यात मात्र दुमत नाही. भारतीय जनता पार्टीच्या बालेकिल्यात विधान परीषदेची उमेदवारी दिली तर शिवसेना (उ. बा.ठा) पक्षाचे खुप महत्व वाढेल. सत्ताधारी देवेंद्र फडणविस असोत किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांना जशास तस उत्तर देवून घाम फोडण्याची धमक फक्त प्रकाश जाधव यांच्यामध्येच आहे अशीही चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगत आहे. पक्षफुटीनंतर विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मेळाव्यात विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खा. संजय राऊत यांनी दिली होती. परंतु भविष्यात प्रकाश जाधव यांच्या रुपाने ही पोकळी भरून निघेल असा विश्वासही यावेळी शिवसैनिकांनी दिला. त्यामुळे उद्धवसाहेब ठाकरे यानी विदर्भातिल योग्य नेतृत्व असलेले माजी खासदार प्रकाश जाधव यांना विधान परीषदेची उमेदवारी दयावी. ही उमेदवारी दुसऱ्यांना दिली तर आम्ही सर्व कुही तालुक्यातील शिवसैनिक विरोध करण्याच्या भूमिकेत राहू असेही यावेळी म्हणाले. प्रकाशभाऊंना एकदा संधी दयाच यासाठी शिवसेना व युवासेना कुही तालुका आग्रही आहे.
प्रतिक्रिया :–

- पूर्व विदर्भात प्रकाश जाधव यांची जुने निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांना फक्त दीड वर्षाकरिता खासदारकी मिळाली होती. त्यावेळी त्यांना पाहिजे तशी कामे करता आली नाही. लोकसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने 15 वर्ष ते सतत पक्षवाढीसाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे अश्या जुन्या जाणत्या अनुभवी व्यक्तीला विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी. – पांडुरंग बुराडे – (माजी जिल्हा प्रमुख शिवसेना)
- प्रकाश भाऊ जाधव यांना विधान परिषदेत पाठवल्यास पुर्व विदर्भात शिवसेना आणखी जोमाने कामाला लागणार… नागपूर जिल्ह्यात व शहरात सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील.. सर्व शिवसैनिकांना एक आधार म्हणून प्रकाश भाऊ जाधव यांच्या रूपाने नवीन संजीवनी मिळेल…
–प्रदीप कुलरकर – (शिवसेना उ.बा.ठा तालुका प्रमुख) - मा. पक्षप्रमुखांनी योग्य विचार करून उमेदवार द्यावा सुधीर सूर्यवंशी सारख्या बिन बुडाच्या गडाव्यांना उमेदवारी देऊन नुकसान करून घेऊ नये करण त्यांची कारकीर्द रामटेक लोकसभेचे संपर्क प्रमुख असतांनी बघतली आहे त्यांनी पक्षच काहीं ठराविक लोकांच्या दावणीला बांधला होता
खरच विदर्भात पक्षाला सुगीचे दिवस आणायचे असतील तर प्रकाश भाऊ सारख्या निष्ठावंत व झुंझार नेत्याला संधी दिली पाहिजे.- युवराज ठवकर – (शिवसेना उपतालुका प्रमुख) - विदर्भात शिवसेना (उ. बा.ठा) पक्षाला जर सुगीचे दिवस आणायचे असतील तर प्रकाश जाधव यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांच्या मेहनतीमुळे आजही शिवसेना गावागावात जिवंत आहे. त्यांना जर विधानपरिषदेची उमेदवारी दिली तर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. व शिवसैनिक आणखी जोमाने पक्षवाढीसाठी कार्य करतील. -मयुर ढेंगे – (युवासेना तालुका प्रमुख कुही)



