कुहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
कुही :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवसा निमित्य सेवा सप्ताह अंतर्गत कुही शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कुही शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पुंडलिक राऊत (उमरेड विधानसभा अध्यक्ष), मामुलकर (जिल्हा उपाध्यक्ष) , नामदेव अंबिलडूके (कुही तालुका अध्यक्ष), सोमदेव वैद्य (कुही तालुका कार्याध्यक्ष), सुरेश गुरनुले (कुही शहर अध्यक्ष), कैलास बोरकर , दामोदर बावणे, कमलाकर भोयर ,श्रीकांत धनजोडे , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मालोदे सर, शिक्षक वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .




