अवैध मोहफुलाच्या अड्यावर धाड ; कुही पोलिसांची कारवाई
कुही :- पोलीस ठाणे कुही हद्दीतील मौजा- चांपा गावातील अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू काढण्यासाठी मोहाफुल रसायन सडवा बाळगणाऱ्या आरोपीतांवर कारवाई करत गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
कुही पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, पाचगाव पोलीस चौकी अंतर्गत मौजा चांपा गावात, पारडी बेडयावर मोहाफुल सडवा वापरून मोहाफुल हातभट्टीची दारू काढल्या जात आहे. अशी माहीती प्राप्त होताच कुही पोलीसांनी पाच पथके नमुन एकाच वेळी पारधी बेडा येथे जावुन कारवाई केली. नमुद ठिकाणी जावुन रेड केली असता आरोपी नामे ज्ञानेश्वर लालचंद पवार, वय ३५ वर्षे, रा. पारधी बेडा,कुही फाटा आणि महीला आरोपी हे मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मिळुन आले. सदर कारवाईमध्ये १)४८०० लिटर मोहाफुल सडवा रसायन किंमती १,६८,०००/-रूपये आणि व २)४८ ड्रम किंमती ९६००/- रूपये असा एकुण १,७७,६०० /- रूपयांचा मुद्देमाल मीळून आल्याने मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये २ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. सदर कारवाई कुही पोलिसांच्या पथकाने केली आहे.



