उभ्या ट्रकला मागून जबर धडक ; भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी

उभ्या ट्रकला मागून जबर धडक 

भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी

कुही :- कुही पोलीस स्टेशन  हद्दीतील उमरेड ते नागपुर NH-353 (D) रोडवर मौजा कुही फाटा शिवारात टायगर काँम्लेक्स धाब्याजवळ लाकडे घेऊन नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा एन रस्त्यात  डीझेल संपल्याने उभा असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या  दुसर्‍या ट्रकने जबर धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार ट्रक क्र. MH-49-AT-6593 चा चालक  ब्रम्हपुरी वडसा येथुन लाकुड भरुन उमरेड मार्गे उमरेड ते नागपुर NH-353 (D) ने नागपुर कापसी येथे घेवुन जात होता. दरम्यान सदर ट्रकमधील  डिझेल संपल्याने ट्रक बंद पडला.  ट्रक ड्रायवरने ट्रकमध्ये डीझेल टाकुन ट्रक चालु करण्याकरीता ट्रकचा खाली जावुन पंप मधील ऐअर काढीत असताना मागून   नागपुरच्या दिशेने जाणारा ट्रक क्र.MH-40-CD-1911 चा चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन उभा असलेला ट्रक क्र. MH-49-AT-6593 ला मागेहुन जबर धडक दिली.  या भीषण अपघातात ट्रक खाली जावुन पंप मधील ऐअर काढीत असलेले ट्रक चालक नंदकिशोर रामभाऊजी सावरकर (वय 40) वर्षे रा. गुलमोहरनगर भरतवाडा रोड, नागपुर नागपुरे शाळेजवळ , नागपुर हे जबर जखमी होऊन त्यांच्या  डोक्याला, छातीला मानेला व दोन्ही हाताला गंभीर मार लागून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ट्रकला मागून धडक देऊन  ट्रक क्र. MH-40-CD-1911  हा समोर काही अंतरावर रोडचे कडेला पलटी होवुन ट्रक चालक  बहादुर धनेश्वर यादव (वय 34) रा. बाबासावजी धाब्याजवळ ,उमरेड ता. उमरेड जि. नागपुर हा जखमी झाला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत जखमींना चांपा टोल येथील अॅम्बुलन्स बोलावुन त्यामध्ये जखमी ट्रक चालक  नंदकिशोर रामभाऊजी सावरकर यास टाकुन मेडीकल काँलेज नागपुर येथे नेले असता तेथील डाँक्टर यांनी तपासुन त्यास मृत घोशीत केले.पोलिसांनी ट्रक क्र. MH-40-CD-1911 चा चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन उभा असलेला ट्रकला  मागेहुन जबर धडक दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मनोहर गभने यांच्यासह पो.ह.दिलीप लांजेवार, पो.ह.जावरकर करत आहेत.