विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त ; वेलतुर पोलिसांची कारवाई

विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त ; वेलतुर पोलिसांची कारवाई

कुही :- पोलीस स्टेशन वेलतूर हद्दीतील मौजा- बोरी सदाचार येथे पेट्रोलिंग दरम्यान विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरट्रोलीवर  वेलतूर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपी विरुद्ध वेलतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात हकीकत अशी  की, वेलतूर पोलीस स्टाफसह  पेट्रोलिंगसाठी  मांढळ मार्गे बोरी सदाचार कडे जात असताना पोलिसांना मौजा-बोरी सदाचार शिवारातील आम नदीच्या पुलावर एक स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा एमएच ४० बीजे ६६२६ क्रमांकाची  ट्रॅक्टरट्रोली  रेती वाहतूक करताना दिसून आला. लागलीच पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला थांबवून परवाना बाबत विचारपूस केली असता ट्रॅक्टर मध्ये विनापरवाना रीती आढळून आली. पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टर चालक दीपक आबाजी पोपटे (वय-४५) रा.वार्ड क्र.६,मांढळ याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून ही कारवाई वेलतुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांचे मार्गदर्शनात पोना मनिराम भुरे सह वेलतूर पोलिसांनी केली आहे.