उपशिक्षणाधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात; शिक्षण क्षेत्रात खळबळ
तसेच ही रक्कम बनसोडच्या माध्यमातून घेण्याची तयारीही दर्शविली. बनसोड यांनी दोघांविरुद्धही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.
नागपूर : शाळचा दर्जा वाढविणे 35 हजारांच्या लाचप्रकरणी आणि कोणतीही त्रुटी न काढता शिक्षणाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

सुशील पंढरीनाथ बनसोड (वय 49) आणि नितीन राजाराम नेवारे (वय 38) अशी आरोपींची नावे आहेत. बनसोड हा जिल्हा परिषद नागपूरच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात विस्तार अधिकारी असून, सध्या त्याच्याकडे प्रभारी उपशिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार आहे. नेवारे हा राज्य विज्ञान प्राधिकरणात वरिष्ठ लिपिक असून, सध्या त्याच्याकडे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपिकचा पदभार आहे. तक्रारकर्ते हे खापा येथील एका शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. त्यांनी अकरावी आणि बारावी या दोन वर्गाचा दर्जा वाढविण्यासाठी इरादापत्र मिळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता.
दरम्यान, हा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्यापुढे ठेवण्यासाठी बनसोडने 20 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्याने 18 जानेवारी रोजी बनसोडला 5 हजार रुपये दिले. त्यानंतर बनसोडने कोणतीही त्रुटी न काढता लवकरात लवकर प्रस्ताव सादर केल्याच्या मोबदल्यात उर्वरित 15 हजार रुपयांची मागणी केली. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्यांना जिल्हा परिषदेकडूनही इरादापत्र घ्यायचे होते. त्यासाठी नेवारे यानेही 20 हजार रुपयांची लाच मागितली.
लाच लुचपत विभागाकडे तक्रार आली अन्…
तसेच ही रक्कम बनसोडच्या माध्यमातून घेण्याची तयारीही दर्शविली. बनसोड यांनी दोघांविरुद्धही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. शनिवारी बनसोडने तक्रारकर्त्याला लाच रक्कम घेऊन जिल्हा परिषद कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बोलावले. एसीबीच्या पथकाने येथे आधीच सापळा रचलेला होता.
दोन्ही रक्कम केल्या वेगळ्या
बनसोडने स्वतःसाठी 15 हजार रुपये आणि नेवारेसाठी 20 हजार असे एकूण 35 हजार रुपये स्विकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. लाच रक्कम जप्त करून एसीबीच्या पथकाने नेवारे यालाही ताब्यात घेतले. दोघांविरुद्धही सदर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.



