कुही तालुक्यात वयस्क शेतकऱ्याची आत्महत्या ; चिंचेच्या झाडाला दोर बांधून लावला गळफास

कुही तालुक्यात वयस्क शेतकऱ्याची आत्महत्या 

चिंचेच्या झाडाला दोर बांधून लावला गळफास

कुही : वयस्क शेतकऱ्याने दारूच्या व्यसनात बुडून गावाबाहेरील चिंचेच्या झाडाला दोर बांधून गळ्यात फास लटकवीत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी हुडपा गावांत उघडकीस आली. गावातून देवळी खुर्द कडे जाणार्या  रस्त्या नजीक असलेल्या चिंचेच्या झाडाला  शेतकऱ्याचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत गावकऱयाना आढळून आला आहे.

भीमराव महादेव भोयर (वय ५८)रा.हुडपा असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव असून शेतकऱ्याकडे पाच एकर शेती आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर शेतकरी त्याच्या शेतात अडीच एकरात मिरची पीक व इतर जागेत चना व गहू आदी पिके घेत आहेत.परंतु यावर्षी हवामानाचा मिरची पिकावर विपरीत परिणाम झाला असल्याने अडीच एकरातील संपूर्ण मिरची पिकांचे प्रचंड नुकसान झाले.पिकांच्या नुकसानीमुळे त्याची मनःस्थिती विचलित झाली. व तो गेल्या आठ दिवसांपासून दारूच्या व्यसनात बुडून गेला. त्यातच तो शुक्रवारी पहाटे घराबाहेर पडला व त्याने देवळी खुर्द मार्गावर असलेल्या त्याने गावाबाहेरील चिंचेच्या झाडाला दोर बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या पश्चात म्हातारी आई वच्छला,पत्नी कमला,मुलगा आशिष,सून व दोन नातू तसेच तीन विवाहित मुली असा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतांचा पंचनामा करीत मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोनि.भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार रोशन नारनवरे करीत आहे.