कुही पंचायत समिती समोर दुचाकींचा अपघात
कुही :– शहरातील पंचायत समिती समोर दोन दुचाकींनी समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजन गंभीर जखमी झाले असून जखमींवर नागपूर येथे उपचार सुरु आहे.
गत आठवड्याभरापासून तालुक्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरु असून मंगळवारी (दि.२८) ला दुपारी 1.३० च्या सुमारास पंचायत समिती समोरील वळणावर दोन दुचाकिंनी समोरासमोर धडक दिली. यात दुचाकी क्र.एमएच ४० आर ७०८३ चा चालक व दुचाकीस्वार सुनील लोडबा लांजेवार (वय-३८) व लखन कमलसिंह चव्हाण (वय-३५) दोघेही रा.कुही गंभीर जखमी झाले असून यांच्या वाहनाला धडक देनारा दुचाकीस्वार धडक देताच घटनास्थळावरून पसार झाला. जखमींना कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून तेथून नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले आहे.