विषारी औषध प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

विषारी  औषध प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

कुही :- कुही पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मौजा- भोला हुडकी(मांढळ) येथे रक्षाबंधनाकरिता माहेरी आलेल्या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.

समता मयूर उईके (वय-२१) रा.जांभळी, ता. सालेकसा, जि.गोंदिया असे मृत विवाहितेचे नाव असून ती पतीसह रक्षाबंधन करिता माहेरी भोला हुडकी (मांढळ) येथे आली होती. दरम्यान सोमवारी  (दि.२६ ऑगस्ट) तिने आईच्या घरी कुणीच नसल्याचे पाहून विषारी औषध प्राशन केले. ती उलट्या करत असल्याचे पाहून तिला तत्काळ मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. व तेथुन पुढील उपचारासाठी नेत  असताना काहीच हालचाल करत नसल्याने कुही येथील ग्रामीण रुग्नालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. कुही पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन करिता पाठवविला आहे. पुढील तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोनि स्वप्नील गोपाले करत आहेत.