Digital Arrest Scam म्हणजे काय ? त्यात तुम्ही कसे लुटले जाता ?

Digital Arrest Scam म्हणजे काय ? त्यात तुम्ही कसे लुटले जाता ?

Digital Arrest Scam News: डिजिटल अटक घोटाळा हा एक प्रकारचा तोतयेगिरीचा गुन्हा आहे. ज्यामध्ये फसवणूक करणारे ई-मेल, मेसेजेस किंवा फोनवरून संपर्क साधून स्वत:ला सरकारी अधिकारी असल्याचे भासवतात. सायबर गुन्हेगार भीती दाखवून बळींची फसवणूक करतात. सध्या, लोकांना फसवण्यासाठी नवीन युक्ती वापरली जाते, ज्यात पोलीस किंवा सरकारी अधिकारी यांसारख्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकऱ्यांबद्दल असलेल्या भीतीचा गैरफायदा घेतला जातो. या युक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळा असे म्हणतात. या घोटाळ्यात, लोकांना आपली फसवणूक होत असल्याचे इशारे लक्षात न आल्यास त्यांना कायदेशीर अडचणींची भीती दाखवून जाळ्यात ओढले जाते.

डिजिटल अटक घोटाळा हा एक प्रकारचा तोतयेगिरीचा गुन्हा आहे. ज्यामध्ये फसवणूक करणारे ई-मेल, मेसेजेस किंवा फोनवरून संपर्क साधून स्वत:ला कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवतात. ते ऑनलाइन गुन्हे किंवा सायबर गुन्हे यांसाठी तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाले असल्याचे किंवा तुम्ही सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे सांगतात. यातून सुटण्यासाठी ते तुम्हाला त्वरित पैसे भरायला किंवा वैयक्तिक माहिती द्यायला सांगतात, तसे न केल्यास अटकेची धमकी देतात‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यात फसवणूक करणारे तुमच्यावर दबाव आणतात आणि घाबरवून तुम्हाला पैसे भरायला किंवा संवेदनशील माहिती द्यायला भाग पाडतात. ते कॉल्स, ई-मेल, टेक्स्ट, सोशल मीडिया मेसेजेस किंवा व्हिडिओ कॉल्सद्वारे संपर्क साधून स्वत:ला कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याचे भासवतात. मेसेजेसमध्ये खोट्या सरकारी शिक्क्यांचा किंवा लोगोचा समावेश असतो आणि ते मेसेज अधिकृत फोन नंबरवरून आले असल्याचे भासवतात.

फसवणूक करणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स किंवा मेसेजिंग सेवा यांचादेखील संपर्क साधण्यासाठी वापर करतात. ते व्हिडिओ कॉलवर कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी पोलीस गणवेशात आणि बनावट पोलीस स्टेशनच्या पार्श्वभूमीवर दिसतात. ही युक्ती ते पीडितांना घाबरवण्यासाठी वापरतात, ज्यामध्ये तुम्ही गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा दावा ते करतात आणि अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे किंवा संवेदनशील माहिती मागतात.संशयास्पद इंटरनेट क्रिया किंवा फसवे व्यवहार यांसारख्या संदिग्ध तरी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये तुमची तपासणी करत असल्याचे ते सांगतात आणि खोट्या केस नंबर किंवा क्लिष्ट कायदेशीर शब्दांचा वापर करून ते अधिकृत असल्याचे भासवतात. होणारी अटक टाळण्यासाठी, ते त्वरित कारवाईची मागणी करतात, जसे की दंड भरणे (क्रिप्टोकरन्सी किंवा गिफ्ट कार्ड्स यांसारख्या माग न काढता येणाऱ्या पद्धतीने) किंवा वैयक्तिक माहिती पुरवणे. तुम्ही त्यांच्या अधिकृततेवर प्रश्न उपस्थित केल्यास किंवा प्रतिसाद देण्यास संकोच केल्यास ते पुढील कायदेशीर कारवाईची किंवा वाढीव दंडाची धमकी देतात.

फोनपेच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी डिजिटल अटक घोटाळ्यांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाच्या नोंदी दिल्या आहेत.जर तुम्हाला असा डिजिटल अटक घोटाळा होत असल्याचा संशय असेल, तर शांत रहा आणि तात्काळ प्रतिसाद देण्याचे टाळा. कारण फसवणूक करणारे लबाडीसाठी तुमच्या भीतीचाच वापर करतात. त्या संपर्काची अधिकृतता तपासण्यासाठी फसवणूक करणाऱ्याने दिलेला नंबर न वापरता त्याऐवजी अधिकृत चॅनलद्वारे संबंधित संस्थेशी संपर्क साधा. स्थानिक अधिकाऱ्यांना किंवा ग्राहक संरक्षण संस्थांना अशा संशयास्पद संदेशांबद्ल कळवा, ज्यामुळे घोटाळ्यांचा मागोवा घेता येईल आणि इतरांनाही सावध करता येईल.जर चुकून वैयक्तिक माहिती दिली गेली असेल, तर ताबडतोब पासवर्ड बदला आणि आर्थिक माहिती दिली गेली असल्यास त्वरित बँकेला कळवा. फिशिंग आणि मालवेअर यांपासून संरक्षणासाठी तुमच्या डिव्हाइसवर अद्ययावत सुरक्षा सॉफ्टवेअर ठेवा. अतिरिक्त संरक्षणासाठी तुमच्या खात्यांवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अंमलात आणा. घोटाळ्याच्या सामान्य युक्त्यांची माहिती ठेवा आणि तुमच्या कुटुंबीयांना तसेच मित्रांना याबाबत माहिती देऊन त्यांनाही अशा घोटाळ्यांपासून सजग ठेवा.