मांढळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मांढळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कुही : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची वार्ता समजताच संपूर्ण राज्यासह कुही – मांढळ परिसरात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, काल मांढळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक परिसर येथे स्थानिक नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान बसस्थानक परिसरात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी माजी उपसरपंच तथा जेष्ठ नेते रामाजी दुधपचारे यांच्या अध्यक्षतेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पुंडलिक राऊत यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित जनसमुदायाने दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ​यावेळी बोलताना स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘राज्याच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता व विकास कामाला महत्व देणारा नेता आज आपण गमावला आहे. मांढळ परिसराच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला होता,’ अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते लीलाधर धनविजय व इतर नेत्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. ​अजित पवार यांच्या अपघाती व अकाली निधनाचे वृत्त समजताच मांढळ मधील बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. अनेक व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

यावेळी भागेश्वर फेंडर, प्रेमदास मोहतूरे, पुंडलिक राऊत सोमदेव वैद्य, पुरुषोत्तम कावळे गुरुजी, प्रदीप घुमडवार, आशीष आवळे, संजय निर्गुलकार, नरेश चौधरी, विनोद ठवकर, विष्णु खंडाळे, मधुकर फोफसे, अरुण हटवार, उपासराव भुते, सुधीर पिल्लेवान, रुपेश तट्टे, दिनेश वैद्य, दुर्गाप्रसाद दुधपचारे, नरेंद्र बारई, दिपक डहारे, राजु तलमले, प्रदीप कुलरकर, विनय गजभिये, सुखदेव जिभकाटे, संदीप सुखदेवे, धनपाल लोहारे, स्वप्नील राऊत, गणेश देशमुख, सचिन पुडके महाराज, जितु लुटे, राजेश तिवस्कर, आर्शीवाद वासनिक, संजय कुर्जेकार, डाकराम फेंडर, क्रिष्णा गवळी, सीमा कुर्जेकार, मंगला मेश्राम, अर्चना पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.