अनैतिक संबंधातून सख्या भावाचा काठीने वार करून खून ; स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने आरोपीला केले जेरबंद

अनैतिक संबंधातून सख्या भावाचा काठीने वार करून खून

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने आरोपीला केले जेरबंद

कुही :-  गुरुवारी  (दि.२८ ऑगस्ट) पोलीस स्टेशन कुही हद्दीत येणाऱ्या  खेडी शिवारात  श्रावण घोरमारे यांच्या शेतीच्या बाजुला पाणी जाण्याकरीता खोदलेल्या नालीत एक अनोळखी पुरूषाचे प्रेत मिळुन आल्याने पोलीस स्टेशन कुही येथे मर्ग नोंद करण्यात आला होता. अज्ञात मृतकाचे पाय दोरीने बांधुन असल्याने सदर प्रकरणात खुन झाला असल्याचे दिसुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला .

पोलिसांनी  गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पध्दतीने तपास करून तात्काळ आरोपी नामे मनोज गंगाधर पिलाणे, वय ४१ वर्षे, रा. शिवनी ता. कुही (|ह. मु. खेडी शिवार) याला ताब्यात घेतले. आरोपीला कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता मृतक हा त्याचा लहान भाउ नामे शिशुपाल गंगाधर पिलाणे, वय ४० वर्षे, रा. शिवनी ता. कुही (ह. मु. खेडी शिवार) हा असुन त्याचे आरोपीच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याने आरोपीने पाडव्याच्या दिवशी मृतक झोपुन असतांना त्याला काठीने डोक्यात मारून त्याचा खुन करून त्याचे पाय बांधुन त्याला नालीत  फेकुन दिल्याचे सांगितले. सदर आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन कुहीला हस्तांतरीत केले आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास कुही पोलीस करीत आहेत.