जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कुही पोलिसांची कारवाई ; एक आरोपी अटक, एकूण किंमत 2,48,000  रुपयांचा मुद्देमाल जप्त

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कुही पोलिसांची कारवाई

एक आरोपी अटक, एकूण किंमत 2,48,000  रुपयांचा मुद्देमाल जप्त

कुही :- पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध मोठी कारवाई केली असून, या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच 2,48,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुधवारी (दि.29 ऑक्टो.)  कुही पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना टाटा एस मालवाहतूक वाहन (क्र. एम.एच. 49/एटी. 7196) हे संशयास्पदरीत्या दिसल्याने वाहनास अडवून तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये २ गायी आणि ३ वासरे , ३ हेले अशा एकूण ८  जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

वाहनचालक सोहेल शब्बीर शेख (वय 2४) रा. प्लॉट क्र. 173, गुलशन नगर, खरबी, नागपूर) यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध कुही पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वाहनाची किंमत 2,00,000 रुपये  व जनावरांची किंमत 48 ,000 रुपये  असा एकूण 2,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि शीतल राणे करीत आहेत.