शुल्लक कारणावरून इसमाचा दगडाने ठेचून खून
अवघ्या काही तासांतच आरोपी गजाआड, कुही पोलिसांची कामगिरी
कुही :- कुही पोलीस स्टेशन हद्दीतील उंद्री शिवारात मुख्य मार्गालगत एका इसमाचा दगडाने ठेचून खून झालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला .घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून काही तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.

प्राप्त माहितीनुसार कुही पोलीस स्टेशन हद्दीतील कुही-नागपूर मुख्य मार्गावर गावंडे क्रेशर नजीक रस्त्याच्या कडेला एक अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची प्राथमिक पाहणी केली असता सदर इसमाच्या तोंडावर व चेहऱ्यावर दगडाने ठेचून खून झाल्याचे दिसून आले. तसेच मृतदेहानजिक एक दगड रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसून आल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी घटनस्थळी मोठी गर्दी केली होती. त्यातूनच मृतक हा नजीकच्याच एका खदाणीवर काम करणारा मुन्नासिंग विश्वनाथ उईके (वय- 52) रा. बांन्दा पो. कलारबाकी थाना बंडोर, ता. जि. शिवनी (म.प्र.) ह.मु. कादर खदान, उंन्द्री असल्याचे निष्पन्न झाले. व मृतक हा काल दुपारच्या सुमारास कुही फाटा भागात गेल्याचेही नागरिकांकडून कळले. लागलीच कुही पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवताच अवघ्या काही तासातच आरोपी जयदीप कुमरे (वय-३४) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. प्राप्त माहितीनुसार मृतक मुन्नासिंग विश्वनाथ उईके व जयदीप कुमरे हे काल सोबतच दारू प्याले व दारूच्या नशेच मृतक मुन्नासिंग याने आरोपी जयदीप याला शिवीगाळ केल्याने त्याच रागातून त्याने मुन्नासिंग याचा दगडाने ठेचून खून केला.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, सहा.पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, वृष्टी जैन यांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर करत आहे.



