कुही नगरपंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शप) नगरसेवकांचा मुख्यमंत्री फडणविस यांचे उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश
कुही नगरपंचायतमध्ये मोठी राजकीय उलटफेर
कुही:- कुही नगरपंचायतीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे 12 नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मा. श्री. राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. नागपूर येथे झालेल्या या समारंभास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे कुही नगरपंचायतीत भाजपचा प्रभाव वाढला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.

पक्षप्रवेश करणाऱ्या मान्यवरांची नावे :
हर्षा संजय इंदोरकर – अध्यक्षा, नगरपंचायत कुही (काँग्रेस), अमित मोतीराम ठवकर – उपाध्यक्ष, नगरपंचायत कुही (काँग्रेस), रूपेश नारायण मेश्राम – नगरसेवक (काँग्रेस), मयूर धनराज तळेकर – नगरसेवक (काँग्रेस), शारदा गणेश दुधपचारे – नगरसेविका, शितल प्रमोद येळणे – नगरसेविका (काँग्रेस), विलास रार्घोते – नगरसेवक (काँग्रेस), निशा सचिन घुमरे – नगरसेविका (काँग्रेस), विद्या सिध्देश्वर लेंडे – नगरसेविका (अपक्ष), वैशाली अरविंद सोमनाथे – नगरसेविका (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), जयश्री अरूण धांडे – नगरसेविका (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), सुषमा परमानंद देशमुख – नगरसेविका (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), जितेंद्र गिरडकर – महाराष्ट्र प्रदेश सचिव (काँग्रेस), संजय इंदोरकर, परमानंद देशमुख, आनंद लेंडे, अरुण धांडे, प्रमोद येळणे , गणेश दुधपचारे


