गट ग्रामपंचायत खोबनाचे उपसरपंच मयूर हिरेखन यांची भाजप युवा मोर्चा कुही मंडळ अध्यक्षपदी निवड..
स्वप्नील खानोरकर
कुही :- भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुही तालुक्यातील तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या नव्या कार्यकारिणीत गट ग्रामपंचायत खोबना चे उपसरपंच मयूर हिरेखन यांची भाजप युवा मोर्चा कुही मंडळ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. लहान गावातील एका निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने कुही तालुक्यातून आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या निवडीबद्दल मयूर हिरेखन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत पाटील, माजी आमदार राजूभाऊ पारवे, सुधीर पारवे, टेकचंद सावरकर, माजी विरोधी पक्षनेते अनिल निधाण, भाजपा जिल्हा महामंत्री सुनील जुवार, मंडळ अध्यक्ष निखिल येळणे, माजी तालुका अध्यक्ष वामन श्रिरामे, माजी उपसभापती इस्तारी तळेकार,युवा नेते सौरभ दंडारे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे मन:पूर्वक आभार मानले.त्यांच्या निवडीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून गावपातळीवरील नेतृत्वाला अशी संधी देऊन पक्षाने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले,मी भाजपमध्ये सुरुवातीपासून कार्यरत असून, पक्षाने वेळोवेळी माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. एकदा कोणीतरी म्हणाले होते की तू फक्त अनुसूचित जातीच्या सेलमध्येच राहशील. पण आज पक्षाने दिलेली ही मोठी जबाबदारी हे दाखवून देते की भाजपा हा भेदभाव करणारा नाही, तर सर्वसमावेशक विचारधारा असलेला पक्ष आहे. पक्षाच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी सदैव निष्ठेने कार्य करीन.


