कुही पोलिसांची जुगार अड्यावर धाड
8 जुगार्यांवर कारवाई करत २ लाख ५४ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कुही :- कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा धामणा ते निंबा रोडवरील सावजी धाब्यावर 52 पानाच्या ताश पत्यांवर हार जितीचा खेळ खेळत असलेल्या अवैध जुगार अड्यावर कुही पोलिसांनी कारवाई करून २,५४,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरुवारी (दि.26) कुही पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना मौजा धामणा ते निंबा रोडवरील सावजी धाब्यावर काहीजण 52 पानाच्या ताश पत्यांवर हार जितीचा खेळ खेळत असल्याची खात्रीशीर मुखाबिराकडून माहिती मिळाली. लागलीच कुही पोलिसांनी पंचासमक्ष धाड टाकली असता धाब्याच्या तळमजल्यावर ८ इसम 52 ताश पत्यांचा हार जितीचा खेळ खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहून काहीजण पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. जुगार खेळताना मिळून आलेल्या ८ इसमांना पंचसमक्ष त्यांचे नाव व गाव विचारलेला असता त्यांनी 1)वतन दादाराव राउत, जुनी बिडीपेठ, नागपूर २) प्रभाकर चिंतामन बुरबुरे (वय-52 वर्ष) रा धामना, ता. जि. नागपुर ३) अनेश राजु माळी (वय 34 वर्ष) रा. वडद ता.उमरेड जि.नागुपर ४)मोहीत सुरेश बळगत (वय 24 वर्ष) रा.बिडगाव ता.कामठी जि.नागपूर ५)सुजीत मुन्ना चव्हाण (वय 29 वर्ष) रा. प्लॉट नं. 47 श्रीएसनगर, नागपुर ६)अश्वजीत विश्वविजयराव महेशगवडी (वय 28 वर्ष) रा.राजीव गांधी नगर, नागपूर 7)शिवन सुनिल नाईक (वय 27 वर्ष) रा.राजीव गांधीनगर, नागपुर 8)शेख रहीमान मुलाम दस्तगीर वय (43 वर्ष) रा. हसनबाग , बडीमस्जीद जवळ,नागपुर असे सांगितले. पोलिसांनी त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असात सदर ईस्माकडुन घटनास्थळवर 52 तासपत्ते, किंमत 50 रुपये व त्याचे बाजुला 2 कागदी पाँकीटमध्ये ठेवलेले 52 तास पत्ते असलेले पाँकीट किंमत 100 रुपये व आरोपीतांकडुन अंगझडतीत एकुण 24,700 रुपये व धाब्यासमोर रस्त्यावर ठेवलली 1 टाटा इंडीका विस्टा कार क्र. एमएम 29 आर 4325 किमंत 2,00,000 रुपये आणी बाजूला ठेवलेले 3 मोबाईल 30,000 रुपये असा संपुर्ण एकुण 2,54,850 रुपयाचा माल मिळुन आल्याने घटनास्थळवरुन जप्त करुन ताब्यात घेण्यात आला.
हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि मनोहर गभणे, पोह. हरिदास चाचरकर, एएसआय कानडे, सह होमगार्ड सैनिकांनी केली आहे.