जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड ; 1 लाख 63 हजार 350 रुपयांचा  मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड 

 1 लाख 63 हजार 350 रुपयांचा  मुद्देमाल जप्त

कुही :- गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कुही तालुक्यातील वडेगाव काळे येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकत जुगाऱ्यांना अटक करत मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना वडेगाव शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून प्रवीण उर्फ गुड्डू नारायण चौधरी (57, रा. प्रतापनगर, नागपूर), विपुल भीमराव बोरकर (35, रा. अजितनाथ सोयायटी, बेसा, नागपूर), निलेश पुरुषोत्तम ठाकरे (40, रा. न्यु सुभेदार लेआऊट, नागपूर), राजेश बाबुराव समर्थ (45, रा. दुर्गा नगर, मानेवाडा, नागपूर), पराग महादेवराव लांजेवार (42, रा. नाईक रोड, महाल, नागपूर) यांना जुगार खेळताना रंगेहात अटक केली. त्यांच्या ताब्यातून 42 हजार 350 रुपये नगदी, दोन मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण 1 लाख 63 हजार 350 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचही आरोपींना पुढील कारवाईसाठी कुही पाचगाव चौकी यांच्या ताब्यात देण्यात आले.  आरोपींविरोधात कलम 12 महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. हि  कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पीएसआय बट्टुलाल पांडे, हेड कॉन्स्टेबल आशिष भुइँ, पोलिस हवालदार मयुर ढेकले, पोलिस हवालदार सत्यशील कोठारे, पोलिस शिपाई रोहित आडे, सुमित बांगडे, पोलिस शिपाई धोंडूतात्या देवकते यांनी पार पाडली.