शुल्लक कारणावरून मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न ; कुही तालुक्यातील घटना

शुल्लक कारणावरून मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न

कुही तालुक्यातील घटना

कुही:- तालुक्यातील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडम येथील एका युवकाने मित्रासोबत झालेल्या भांडणातून मित्राला पांदण रस्त्यावर नेत जबर मारहाण करत गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी युवकाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कुही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज दीपक डाहाके (वय 19) रा.अडम असे आरोपीचे नाव असून असून फिर्यादी गुड्डू मिताराम भजनकर (वय20) रा. अडम हे एकमेकांचे मित्र आहेत. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी आरोपीच्या घरचे लक्ष्मीपूजन असल्याने त्याने मित्र गुड्डू भजनकर याला मांढळ येथे सामान खरेदी करण्यास जायचे असून आपल्या दुचाकीवर त्याला मांढळ येथे घेऊन आला.सामान खरेदी केल्यावर मांढळ येथील बँक ऑफ इंडियाच्या बाजूने असलेल्या एका पानठेल्यावर पान खाण्यासाठी घेऊन गेला. तिथे दोघांनीही पान खाल्ले त्यावेळी आरोपी युवराज ने मित्र गुड्डू सोबत भांडण उकरून काढत वाद केला व ढकल-ढुकल केले. काही वेळाने राग शांत झाल्यावर दोघेही रात्री 8 च्या दरम्यान गावी अडम येथे परत जाण्यास निघाले. आरोपी युवराज ने वडेगाव समोरील वडेगाव-ब्राम्हणी पांदण रस्स्यावर गाडी नेत असल्याने गुड्डू याने आरोपीस गाडी इकडे कुठे नेत असल्याची विचारणा केली. तेव्हा आरोपीने समोर मला थोडं काम असल्याचे सांगत पुढे नेऊन पांदण रस्त्यावर काही अंतरावर गाडी थांबवत मला खाली उतरवले व मांढळ येथे माझ्यासोबत का भांडण केले असे बोलत फिर्यादी गुड्डू याला हाथ बुक्याने मारहाण सुरू केली. मला का मारतोस असे विचारूनही आरोपी थांबला नाही तर त्याने गुड्डू ला खाली पाडत छातीवर व पायावर जोरदार लाथ मारली व हाताने गळा दाबला. व गळा दाबून मृत्यू झाला असे समजून खेचत बाजूच्या शेतातील पराठीमध्ये नेऊन टाकले. मात्र गुड्डू हा गळा दाबल्याने बेशुद्ध पडला होता. आरोपी युवराजने गुड्डूला तिथेच टाकून तिथून निघून गेला.
मात्र आरोपीच्या मनात भीती असल्याने त्याने ही गोष्ट घरच्यांना सांगितली. त्यानंतर आरोपीच्या घरच्यांनी ही माहिती गावच्या पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर लगेच पोलीस पाटील याने मांढळ पोलीस चौकीचे बिट जमादार सुधीर ज्ञानबोनवार यांना दिली. ज्ञानबोनवार यांना माहिती मिळताच वरिष्ठांना याची माहिती देत आरोपीला ताब्यात घेत घटनास्थळी दाखल होऊन फिर्यादी गुड्डू याला तपासले असता तो बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. त्याला लगेच कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.पोलिसांनी फिर्यादी गुड्डू भजनकर याच्या तक्रारीवरून कुही पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरिश्चंद्र इंगोले सह सुधीर सुधीर ज्ञानबोनवार करीत आहे.