प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
अनेक खर्रा दुकाने कारवाईच्या भीतीने बंद
कुही :- तालुक्यातील मौजा- सिर्सी पुनर्वसन येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू बाळगून त्याची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वेलतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या कारवाईने वेलतूर पोलीस स्टेशन परिसरातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पासून तयार करण्यात येणारे अनेक खर्रा दुकाने कारवाईच्या भीतीने दुकानदारांनी खर्रा विक्री बंद केल्याची माहिती आहे.
पोलीस स्टेशन वेलतूर येथील स्टाफ पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजा सिर्सी पुनर्वसन येथे एक इसम प्रतिबंधित सुगंधित तंबाखू बाळगून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. लागलीच पोलिसांनी सापळा रचून स्टाफसह रेड केली असता. जगदिश उर्फ जग्गु वसंता पानसे (वय-३०) रा.वार्ड क्र.०३, सिर्सी पुनर्वसन, ता. कुही हा त्याच्या जग्गु पान पॅलेस पान टपरी मध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आले. आरोपीकडुन १) लाल रंगाची प्लास्टीक पॅलीथीन पॅकेट त्यावर VIRAT असे लिहीलेले १९ पॅकेट प्रत्यकी अंदाजे २५० ग्रॅम किमंती १६०/ रु एकुण ३०४० /- रु. चा माल, २) काळया शेंदरी रंगाचा पॅकेट ज्यावर ईग्रजीमध्ये EAGIE व मराठीत ईगल असे नाव लिहलिले ०७ पॅकेट प्रत्येकी ४०० ग्रॉम कि . ६४० रु एकुण ४४८०/-रु असा एकुण ७५२० / – रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्याचे हितासाठी सुगंधीत तंबाखु तत्सम पदार्थ उत्पादन करणे विक्री निर्मीती साठवणुक वितरण करण्यास प्रतिबंध केलेले असतानां सुदधा यातील आरोपी याने त्यांचे जग्गु पान पॅलेस पान टपरी मध्ये स्वतःच्या आर्थीक फायदा करिता सुगंधीत तंबाखु साठवणुक केली असल्याने त्याचे विरुदध वेलतूर पोलीस स्टेशन येथे कलम २२३, २७४, २७५ भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे.