कुही : अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला
कुही:- तालुक्यातील मौजा तारणा येथील नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर कुहीच्या महसूल पथकाने पकडला असून वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
कुही येथील महसूल विभागाचे पथक पेट्रोलिंग करित असताना रात्री 1 च्या सुमारास तालुक्यातील तारणा येथील नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करित असलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडला. घटनास्थळावर महसूल विभागाने पंचनामा करित अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कुहीचे तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांच्या पथकाने केली आहे.



