दुचाकीच्या धडकेने पायदळ चालणाऱ्याचा मृत्यू ; तर दुचाकीचालक गंभीर जखमी

मृतक एकनाथ मागील अनेक वर्षांपासून पांडेगाव येथे राहत असून तो कुठून आला व त्याचे आई-वडील, भाऊ-बहिण व नातेवाईकाचा काहीच पत्ता नव्हता. तो सांगेल त्याचे काम करत असे व मिळेल तिथे खात असे.व कुणाचा आडोशा कुणाची छप्पर हाच त्याचा निवारा.  पुढे वयोनुमानानुसार त्याची स्मृती भ्रंश होत गेली व तो पायदळ आजूबाजूच्या गावात फिरत होता. विशेष म्हणजे एकनाथ याला पंचक्रोशीतली जनता ओळखत होती. बुधवारी एकनाथ याच्या अपघाती मृत्युच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली होती. त्यांची अंतविधी गावकर्यांनी लोकवर्गणीतून करत संपूर्ण गाव त्याच्या अंतयात्रेत सहभागी होता.

कुही:- शहरातील बुधवारला असलेला आठवडी बाजार आटोपून दुचाकीने गावी परत जात असताना अचानक पायदळ चालणारा व्यक्ती गाडीसमोर आल्याने दुचाकीची पायदळ चालणाऱ्यास धडक झाली. यात पायदळ जात असलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.

बुधवारी आठवडी बाजारासाठी पांडेगाव येथील कुणाल सुरेश धनजोडे व त्याचा मित्र विशेष जर्वेकर हे दोघेही कुही येथे आले होते. व बाजार आटोपून कुही येथून 7.30 च्या सुमारास त्यांच्या दुचाकी क्र. एमएच 40 एडी 0638 याने पांडेगाव येथे परत जात होते. दरम्यान कुही शहरापासून काही अंतरावर असलेल्या पांडेगाव रोडवरील गुरु गोसावी मंदिर नजीक रस्त्यावर अचानक यांच्या दुचाकी समोर एक पायदळ जात असलेला इसम आला. अचानक समोर आल्याने दुचाकीने पायदळ  जात असलेल्या इसमास धडक दिली. या अपघातात वाहनावरील दोघे व पायदळ जाणारा तिघेही रोडवर पडले. यात दुचाकी चालक कुणाल धनजोडे हा गंभीर जखमी झाला व पैदल जात असलेला  एकनाथ नामक इसम हे जखमी झाले तर विशेष याला किरकोळ मार लागला.  जखमींना तात्काळ कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व तिथून नागपूर येथे रेफर करण्यात आले. त्यात पायदळ जाणारे एकनाथ नामक इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दुचाकी चालक कुणाल  याच्यावर नागपूर येथील इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.    या प्रकरणी कुही पोलीस स्टेशन येथे अपघाताचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी स्वप्निल गोपाले करीत आहेत.