संतापजनक : मांढळ येथे नालीत आढळले नवजात शिशुचे शव ; आरोपींचा शोध सुरु
कुही :- आईच्या ममतेची हजारो उदाहरणे आपल्याला आसपास सापडतात. मात्र नवजात बाळाला जन्म झाल्यावर चक्क नालीत फेकुन दिल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील मांढळमध्ये समोर आला आहे. हृद्य पिळवटून टाकनाऱ्या या घटनेने जनमानस हादरले आहे.
मांढळ येथील वार्ड क्र. ४ मध्ये सुरू असलेल्या नवनिर्मानधिन नाली मध्ये एका अज्ञात नवजात शिशुचे शव आढळून आले.शव आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत तपासणी केली असता एक नवजात शिशुबालक नालीत कोणीतरी टाकले असल्याचे निदर्शनात आले . निर्माणाधिन मातीच्या खोदलेल्या नालीमध्ये पाण्यावर तरंगतांना उतान्या स्थितीत नवजात शिशुबालक नाळ लागलेल्या स्थितीत दिसून आला. कुही पोलिसांनी चंद्रशेखर घुटके नामक व्यक्तीच्या मदतीने नवजात शिशुबालकाला पाण्यातुन बाहेर काढले. तेव्हा नमुद शिशुबालक हे स्त्री जातीचे असल्याचे दिसून आले. .सदर शिशु बालकाचा मृतदेह विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे नालीत टाकले असल्याचा कयास लावला जात आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र अद्यात आरोपीविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. कुही पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. सुधीर ज्ञानबोनवार करीत आहे.









